Home अहमदनगर नगरला ऑक्सिजन साठा उपलब्ध: डॉ.राजेंद्र भोसले यांची माहिती  

नगरला ऑक्सिजन साठा उपलब्ध: डॉ.राजेंद्र भोसले यांची माहिती  

Oxygen reserves available to Ahmednagar

अहमदनगर: शहरात ऑक्सिजनचा निर्माण झाल्यामुळे मंगळवारी शहरातील डॉक्टरांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन ऑक्सिजन पुरवठा करण्याची मागणी केली होती. काही हॉस्पिटलमध्ये ४ ते ५ तास पुरेल एवढाच साठा उपलब्ध होता.

शहरातील खासगी हॉस्पिटलचे ऑक्सिजन कमी होत असल्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांकडून चिंता व्यक्त होत होती. मात्र जिल्हा प्रशासनाने तत्काळ हालचाली करत शहरासाठी ऑक्सिजन उपलब्ध केले आहे. रात्री ११ च्या सुमारास शहरात २९ मेट्रिक टन ऑक्सिजन दाखल झाले. उपलब्ध ऑक्सिजन जिल्हाधिकारी नियोजनानुसार जिल्हा रुग्णालय व खासगी रुग्णालयात वितरीत करण्यात आले आहे.

दरम्यान ऑक्सिजन व रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवठा सुरक्षित व्हावा यासाठी काल दुपारपासून स्वयंसेवी संस्थांच्या महासंघाचे आंदोलन सुरु आहे. बुधवारी भर उन्हात हे आंदोलन सुरु आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्या पुढाकारातून हे आंदोलन सुरु आहे.

Web Title: Oxygen reserves available to Ahmednagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here