Home अकोले संगमनेर अकोलेतील सात सराईत गुन्हेगार तडीपार

संगमनेर अकोलेतील सात सराईत गुन्हेगार तडीपार

Breaking News | Sangamner:  संगमनेर तालुक्यातील सहा आणि अकोले तालुक्यातील एक अशा सात सराईत गुन्हेगारांना तीन जिल्ह्यांतून वेगवेगळ्या कालावधीसाठी प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांच्या आदेशानुसार तडीपार.

Criminals nabbed at seven inns in Sangamner Akole

संगमनेर: संगमनेर उपविभागातीलअसलेल्या संगमनेर तालुक्यातील सहा आणि अकोले तालुक्यातील एक अशा सात सराईत गुन्हेगारांना तीन जिल्ह्यांतून वेगवेगळ्या कालावधीसाठी प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांच्या आदेशानुसार तडीपार करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की अनिकेत गजानन मंडलिक (रा. माळीवाडा, संगमनेर) याच्याविरुद्ध घरफोडी, एटीएम फोडण्याचा प्रयत्न, विनयभंग, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव गोळा करणे, शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करणे असे तीन गुन्हे दाखल आहेत. त्यावरून त्याला अहमदनगर जिल्हा, नाशिकमधील सिन्नर तालुका आणि पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यांतून सहा महिन्यांसाठी हद्दपार केले आहे. संपत उर्फ प्रशांत शांताराम गागरे (रा. कोळवाडे, संगमनेर) याच्याविरुद्ध चाकूने वार करणे, वार करणे, एअरगण रोखून धमकावून खून करणे, गजाने मारहाण करणे, कांद्याच्या गंजीला आग लावून नुकसान करणे, शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण करणे, जबरी चोरी करणे असे गंभीर स्वरुपाचे विविध पोलीस ठाण्यांत आठ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यास अहमदनगर जिल्हा, नाशिकमधील सिन्नर तालुका आणि पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार केले आहे. अकोले तालुक्यातील राजूर येथील संजय अदालतनाथ शुक्ला याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, गैरकायद्याने जमाव गोळा करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे, लाथाबुक्क्यांनी मारहाण करणे, विना परवाना दारु बाळगणे असे पंधरा गुन्हे राजूर पोलिसांत दाखल आहे. त्यावरुन त्यास अहमदनगर जिल्हा, नाशिकमधील सिन्नर व इगतपुरी तालुका आणि पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून तीन महिन्यांसाठी हद्दपार केले आहे.

संगमनेर शहरातील जनतानगर येथील वरद लक्ष्मण लोहकरे याच्यावर शहर पोलिसांत मोपेड पेटवून देणे, घरात घुसून शिवीगाळ करून दमदाटी करणे, दुखापत करणे, घरातील सामानाची तोडफोड करून नुकसान करणे असे चार गुन्हे दाखल आहेत. त्यावरुन त्यास अहमदनगर जिल्हा, नाशिकमधील सिन्नर तालुका व पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यांतून सहा महिन्यांसाठी हद्दपार केले आहे. संगमनेर तालुक्यातील कुरण येथील लाल्या उर्फ अल्ताफ शेख याच्याविरुद्ध दुचाकी चोरी, घरात घुसून विनयभंग, ट्रक चोरी करणे, बेकायदेशीर जमाव गोळा करणे, दुखापत करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे असे जुन्नर व शहर पोलीस ठाण्यात सात गुन्हे दाखल आहेत. त्यावरून त्यास अहमदनगर जिल्हा, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका व पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील एका वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. तालुक्यातील धांदरफळ येथील सचिन म्हसकुले याच्याविरुद्ध घरफोडी, मारण्याचा प्रयत्न करणे, गैरकायद्याने जमाव गोळा करून गंभीर दुखापत करणे, विनापरवाना शस्त्र जवळ बाळगणे असे तीन तालुका पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. त्यावरून त्यास अहमदनगर जुन्नर तालुक्यातून तीन महिन्यांसाठी हद्दपार केले आहे. धांदरफळ येथीलच अतुल कोल्हे याच्यावर खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देणे असे तालुका पोलीस ठाण्यात पाच गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यावरून त्यास अहमदनगर जिल्हा, नाशिकमधील सिन्नर तालुका व पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यांतून सहा महिन्यांसाठी हद्दपार केले आहे. सदर कामगिरीत संगमनेर शहराचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, तालुक्याचे देवीदास ढुमणे आणि राजूरचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांचा सहभाग होता.

Web Title: Criminals nabbed at seven inns in Sangamner Akole

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here