Home जामखेड अहमदनगर: गळफास घेत एकाची आत्महत्या, दोन महिलांविरूद्ध गुन्हा

अहमदनगर: गळफास घेत एकाची आत्महत्या, दोन महिलांविरूद्ध गुन्हा

Breaking News | Ahmednagar: एका व्यक्तीने बसमध्ये बसवून दिल्यानंतर हरवलेल्या भावास सापडून दे नाहीतर तुझ्याकडे पाहून घेतो, असे धमकावल्याने या त्रासाला कंटाळून एकाने पाडळी शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना.

Suicide of one by hanging, crime against two women

जामखेड: एका व्यक्तीने बसमध्ये बसवून दिल्यानंतर हरवलेल्या भावास सापडून दे नाहीतर तुझ्याकडे पाहून घेतो, असे धमकावल्याने या त्रासाला कंटाळून एकाने पाडळी शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन महिलांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेखा सुनील खिल्लारे व

सारीका प्रदीप सरदार (दोघी.रा. छत्रपती संभाजीनगर) असी गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावे आहेत. याप्रकरणी ज्ञानेश्वर शंकर साळवे (रा. राजनगर मुकुंदवाडी, ता. जिल्हा छत्रपती संभाजीनगर) यांनी जामखेड पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार आत्महत्या केलेले प्रेमचंद उर्फ प्रेम शंकर साळवे हे छत्रपती संभाजीनगर येथून जामखेड तालुक्यातील कुसडगाव परीसरात रंगकाम करण्यासाठी आले होते. यातील एका संशयित महिलेचा भाऊ राजरतन वसंतराव अवसरमल हा काही दिवसांपासून बेपत्ता झाला

आहे. मयत प्रेम शंकर साळवे यांनी अवसरमल यास छत्रपती संभाजीनगर येथे जाण्यासाठी एसटीबस मध्ये बसवून दिले होते. मात्र तेव्हापासून तो बेपत्ता झाला होता. त्यामुळे संशयित महिला या साळवे यांच्यावर तू आमचा भाऊ सापडून दे नाहीतर आम्ही तुझ्याकडे पाहून घेऊ असे म्हणून धमक्या देत होत्या. त्यांच्या त्रासाला कंटाळून अखेर मयत प्रेमचंद शंकर साळवे यांनी रविवारी दुपारी जामखेड तालुक्यातील पाडळी गावच्या शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी मयताच्या नातेवाईकांनी वरील आरोपी हे मयत प्रेमचंद उर्फ प्रेम साळवे यांच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याने संबंधित धमकी देणाऱ्या दोन्ही महिलांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई संतोष पगारे करत आहेत.

Web Title: Suicide of one by hanging, crime against two women

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here