Home अकोले बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण करण्याचा दिवस -शशिकांत कुलकर्णी.

बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण करण्याचा दिवस -शशिकांत कुलकर्णी.

बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण करण्याचा दिवस -शशिकांत कुलकर्णी.

सर्वोदय विद्या मंदिर खिरविरेत बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा.
पिंपळगाव नाकविंदा / प्रतिनिधी -भारताच्या इतिहासातला काळालाही स्तब्ध करणारा दिवस हा दिवस बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण करण्याचा तसेच त्यांनी सांगितलेल्या मार्गांचा अवलंब करण्याचा दिवस असल्याचे प्रतिपादन जेष्ठ शिक्षक शशिकांत कुलकर्णी यांनी केले.
घायाळ पाखरांना पंख दिले तु, मुक्या वेदनांना शब्द दिले तु, तुझ्याच चेतनेने जगण्याचा अर्थ आला युगा, युगाच्या शोषितांचा उद्धार तुच केला. असे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खिरविरे(ता.अकोले) येथे साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक शशिकांत कुलकर्णी अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
या कार्यक्रमाप्रसंगि दिपक पाचपुते, संपत धुमाळ, कविता वाळुंज, भरत भदाणे, नानासाहेब शिंदे, भाऊसाहेब कोते, धनंजय लहामगे, प्रा. रामदास डगळे, प्रा.विक्रम आंबरे, प्रा. सचिन लगड, प्रा. संजय देशमुख, प्रा.एकनाथ डगळे, प्रा. संगिता भांगरे, लिपिक भास्कर सदगिर, सुधिर पराड, पि.के.बेणके, सुनिल देशमुख, सुभाष बेणके यांसह विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक दिपक पाचपुते यांनी पुस्तकांसाठी घर बांधणारे एकमेव विद्वान, जागतिक दर्जाचे अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडीत, राजकारणी, लेखक, कुशल संसदपटटू, स्त्री उद्धार कर्ते, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, बॅरिस्टर, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर असल्याची ओळख निर्माण करून दिली.
तसेच त्यांनी डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. हरी नरके, दादासाहेब रुपवते यांचे दाखले देत मोडेल पण वाकणार नाही. पाय आपले असले पण वाटा आपल्या नसतात त्यासाठी मार्ग शोधा, ग्रामीण भागाचे भांडवल करू नका असे प्रतिपादन केले.
नानासाहेब शिंदे यांनी गरीब आणि श्रीमंत यांचा भेदभाव एका मताच्या रूपाने अधिकार बहाल करणारे तसेच रक्ताचा एकही थेंब न सांडता जगातली सर्वात मोठी धम्म क्रांती करणारे, कामाचे चौदा तासांचे आठ तास करणारे खरे कामगार नेते ज्ञानाचा सर्वव्यापी सर्वश्रेष्ठ महामेरू म्हणजे डॉ.आंबेडकर असल्याचे प्रतिपादन केले.
प्रा. रामदास डगळे यांनी शिका संघटित व्हा, संघर्ष करा. डॉ.आंबेडकर म्हणजे शेतकऱ्यांना त्यांचे हक्क बहाल करनारा करूणासागर असा हिरा कुशीत पडलेला पाहुन चैत्यभुमी मनात धन्य झाली होती असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सचिन लगड यांनी केले. तर कविता वाळुंज यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Website Title: day to remember Babasaheb ambedkar thoughts


संगमनेर न्यूज | Sangamner News | वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा



प्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here