Home अकोले मेहेंदुरी गावास बीडीओंची सदिच्छा भेट.

मेहेंदुरी गावास बीडीओंची सदिच्छा भेट.

मेहेंदुरी गावास बीडीओंची सदिच्छा भेट.

पत्रकार संघाच्या उपक्रमाचे केले कौतुक.
पिंपळगाव नाकविंदा/ प्रतिनिधी:-महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाने दत्तक घेतलेल्या मेहेंदुरी गावास अकोले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भास्कराव रेंगडे यांनी सदिच्छा भेट दिली.पत्रकार संघाने राबविलेल्या या अनोख्या उपक्रमाचे भास्करराव रेंगडे यांनी तोंडभरून कौतुक केले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाने मेहेंदुरी गाव दत्तक घेऊन संपूर्ण राज्यात एक आदर्श निर्माण केला आहे.त्यामुळे या गावास अनेक लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी भेट देऊन या उपक्रमाची पाहणी केली आहे.याचाच एक भाग म्हणून गटविकास अधिकारी भास्करराव रेंगडे यांनी मेहेंदुरी गावास सदिच्छा भेट दिली.
यावेळी मेहेंदुरीच्या सरपंच रुपाली संगारे,ग्रामपंचायत सदस्य सुनील बंगाळ,बेबीताई जगताप,ग्रामपंचायत कर्मचारी रोहिदास पवार,सुरेश गायकवाड,सुरेश जगताप,सागर आरोटे,पत्रकार शंकर संगारे यांसह मेहेंदुरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गटविकास अधिकारी श्री. रेंगडे यांनी प्रथम ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत दप्तर तपासून झालेल्या कामाचा आढावा घेतला. तसेच समाज कल्याण अंतर्गत कामांची दप्तरी तपासणी करून रमाई आवास योजनेचा आढावा घेतला.प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांचा व पशु वैद्यकीय दवाखाण्याचा आढावा घेऊन विकास कामांचा आराखडा तपासून घेतला.यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुनील बंगाळ यांनी ग्रामस्थांच्या वतीने गटविकास अधिकारी भास्कराव रेंगडे यांचा सत्कार केला. 
श्री.रेंगडे यांनी पत्रकार संघाने गावात केलेल्या संपूर्ण कामाचा फेरफटका मारून या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले.यावेळी संपूर्ण गाव रेखाटणाऱ्या पेंटर बाळासाहेब भोर यांच्या कलेचे ही श्री.रेंगडे यांनी विशेष कौतुक केले.गावातील भिंतींवर स्त्री-भ्रूण हत्या,शालेय मुलांसाठी काढलेली छायाचित्रे यांचे ही गटविकास अधिकारी श्री.रेंगडे यांनी विशेष कौतुक केले.

Website Title: Mehanduri Greetings of the BDO


संगमनेर न्यूज | Sangamner News | वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक कराप्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here