Home अहमदनगर या तालुक्यात आढळला रस्त्यावर मयत बिबट्या, असा प्राथमिक अंदाज

या तालुक्यात आढळला रस्त्यावर मयत बिबट्या, असा प्राथमिक अंदाज

Dead Bibatya found on the road in the rahata taluka

राहता | Rahata: राहता तालुक्यातील लोणी हनमंतगाव रस्त्यावर असलेल्या स्वातंत्र्य चौकात असलेल्या ब्रम्हाने बनसोडे वस्ती जवळ शनिवारी सकाळी सहा वाजता मयत अवस्थेत बिबट्या आढळून आला आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेत हा एक वर्षाचा बिबट्या मयत झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नेमकी कशामुळे बिबट्या मयत झाला याचे कारण समजू शकले नाही.

दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने मोठी दहशत केली होती. बिबट्याने अनेकांवर जीवघेणा हल्ला चढविला आहे. यामुळे संपूर्ण उत्तरेकडील तालुक्यांत बिबट्याची दहशत व भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तरेकडील तालुक्यात रस्त्यावर बिबट्याचा वावर वाढला असल्याने रस्त्यावर येवून त्याचा अपघात झाला असावा असा अंदाज आहे. 

Web Title: Dead Bibatya found on the road in the rahata taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here