Home महाराष्ट्र Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा कॉंग्रेसला सणसणीत टोला

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा कॉंग्रेसला सणसणीत टोला

Uddhav Thackeray on Congress

Uddhav Thackeray on Congress: काही दिवसांपासून कॉंग्रेस पक्षाकडून आगामी निवडणुकाबाबत स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. कॉंग्रस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तसे जाहीर केलेले आहे. स्वबळावर निवडणुका लढण्याच्या नाऱ्यावरुन आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस पक्षाला टोला लगाविला आहे.

शिवसेनच्या वर्धापन दिनानिमित ते तमाम शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हंटले, अनेक पक्ष स्वबळाचा नारा देत आहेत. स्वबळ केवळ निवडणुका लढवण्यासाठी असू नये. स्वबळ हे अभिमानाचं, स्वाभिमानाचं असावं. आम्ही देखील स्वबळाचा नारा देऊ, स्वबळावर लढणं हा आमचा हक्क आहे.

उद्धव ठाकरे यांच्या संबोधित काही महत्वाचे मुद्दे:

गेली दोन वर्षे वेगळ्या पद्धतीने वर्धापन दिन साजरा करत आहोत, गेले 55 वर्षे अनेकांचे रंग पाहिले, सत्ता नाही म्हणून काहींचा जीव कासाविस होतोय, समोर गर्दी, घोषणा, टाळ्या नसतील तर भाषण करण कठीण होतं, आम्ही देखील स्वबळाचा नारा देऊ, स्वबळावर लढणं हा आमचा हक्क आहे, स्वबळ केवळ निवडणुका लढवण्यासाठी असू नये, स्वबळ हे अभिमानाचं, स्वाभिमानाचं असावं, उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला टोला, निवडणुका येतात आणि जातात, सत्ता गेल्याने अनेकांना पोटदुखी झाली आहे, अनेकांना पोटशूळ झाला आहे, महाविकास आघाडीच्या कामाने अनेकांना पोटदुखी, हिंदुत्वासाठी मी जरुर लढेल, हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व, नंतर प्रादेशिक अस्मिता, हिंदुत्वावर आलेलं संकट आम्हाला चालत नाही, हिंदुत्व हे काही पेटंट नाहीये, मराठी माणसाच्या हक्कासाठी आमचा लढा कायम, संकट येतात तेव्हा शिवसेना पुढे सरसावते, ममतांनी ताकद दाखवून दिली, त्याला स्वबळ म्हणतात, प्रादेशिक अस्मिता कशी जपायची याचं उदाहरण बंगालने घालून दिलं, बंगाली माणसांनी निर्भिडपणे मतं मांडलं, स्वत्व काय असतं हे बंगालने दाखवून दिलं, सत्तेसाठी देशात राजकारणाचं विद्रुपीकरण सुरू आहे, घराबाहेर न पडताही काम होऊ शकतात हे दाखवलं, शिवसैनिक कधीही खचला नाही, रक्तपात नाही तर रक्तदान करणारे शिवसैनिक ही ओळख, सत्तेसाठी लाचार होणार नाही हे आमचं व्रत, विकृत राजकारण करत राहिलो तर आपलं काहीही खरं नाही, कुणी स्वबळावर सत्ता आणू म्हटलं तर लोक जोड्याने मारतील.

Web Title: Uddhav Thackeray on Congress

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here