Home क्राईम संगमनेर तालुक्यात चोरट्यांनी शाळेचे कुलूप तोडून स्मार्ट टीव्ही लांबविला

संगमनेर तालुक्यात चोरट्यांनी शाळेचे कुलूप तोडून स्मार्ट टीव्ही लांबविला

Sangamner taluka ZP School Smart tv Theft

संगमनेर | Theft: संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील दरेवाडी अंतर्गत जोंधळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी स्मार्ट टीव्ही चोरून नेल्याची घटना घडली आहे. या स्मार्ट टीव्हीची साधारणतः ३२ हजार ८३८ रुपये किमतीचा टीव्ही चोरून नेल्याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरेवाडी गावांतर्गत असलेल्या जोंधळवाडी येथे पहिली ते पाचवीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. सध्या कोरोनमुळे शाळा बंद असल्याने याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी शाळेचे कुलूप तोडून आत प्रवेश करत आतमध्ये असलेला ३२ हजार ८३८ रुपयांचा स्मार्ट टीव्ही चोरून पोबारा केला आहे.

याप्रकरणी मुख्याध्यापक रवींद्र किसन ठुबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल एस.डी.ववायाळ हे करीत आहे.

Web Title: Sangamner taluka ZP School Smart tv Theft

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here