Home अहमदनगर दरोडा हल्ल्यात पिता पुत्र जखमी, सोने चांदी लंपास

दरोडा हल्ल्यात पिता पुत्र जखमी, सोने चांदी लंपास

Father and son injured in robbery gold and silver lamps

शेवगाव | Shevgaon Robbery: शेवगाव तालुक्यातील हातगाव येथे अज्ञात दरोडेखोरांनी घरात प्रवेश करत दोघा जणांवर प्राणघातक हल्ला केला. ही घटना शनिवारी पहाटे घडली. या प्राणघातक हल्ल्यात दिलीप रामराव झंज वय 65 व प्रकाश दिलीप झंज वय 31 दोघे पितापुत्र जबर जखमी झाले आहेत तसेच सोने चांदीच्या दागिन्यासह मोठा ऐवज चोरून नेला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हातगाव येथील झंज कुटुंब गावात राहते. दरोडेखोरांनी शनिवारी पहाटे दोन ते तीन वाजेच्या सुमारास घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. सामानाची उचकापाचक करत रोख रक्कम व सोने चांदीच्या दागिने लंपास केले जात असताना दिलीप झंज, प्रकाश झंज यांनी दरोडेखोरांशी प्रतिकार केला. दरोडेखोरांनी पितापुत्रावर सशस्त्र हल्ला केल्याने दोघे रक्तबंबाळ झाले डोक्यात धारदार हत्याराने वार केले. आरडाओरडा केल्याने दरोडेखोर पसार झाले.

जखमी पिता पुत्रांना उपचारासाठी शेवगावला हलविण्यात आले. मात्र डोक्याला जबर मार लागल्याने अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. ग्रामस्थांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. उपनिरीक्षक, शेवगावचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे, यांनी भेट दिली.

Web Title: Father and son injured in robbery gold and silver lamps

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here