Home अकोले अकोले: प्रवरा नदीत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटेना

अकोले: प्रवरा नदीत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटेना

Breaking News | Akole: प्रवरा नदीपात्रात एका ४० ते ४५ वर्षीय अनोळखी इसमाचे प्रेत आढळून आले.

Dead body found in Pravara river was not identified

अकोले : शहरातील शेकईवाडी शिवारातील प्रवरा नदीपात्रात एका ४० ते ४५ वर्षीय अनोळखी इसमाचे प्रेत आढळून आले आहे. या मृतदेहाची ओळख पटली नसून नातेवाईक अथवा ओळखीचे कोणी असेल तर त्यांनी अकोले पोलिसांशी संपर्क साधावा, असे अवाहन पोलिसांनी केले आहे.

याबाबत शनिवार दि. १ जुन २०२४ रोजी सकाळी ११ वाजेपूर्वी शेकईवाडी शिवारातील प्रवरा नदीपात्रात तरंगताना एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता.

अकोले पोलिसांच्या माहितीनुसार हा इसम हा ४० ते ४५ वयोगटातील असून त्याच्या अंगात काळ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅट आहे. रंगाने सावळा तर चेहरा गोल आहे. त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्याजवळ ओम चिन्ह गोंदण गोंदलेले आहे. अनोळखी इसमाचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत असल्याने व अनोळखी असल्याने त्यांचा प्रशासनाचे वतिने अंत्यसंस्कार करण्यात आला आहे. या अनोळखी इसमाचे मृतदेहाबाबत अकोले पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.

Web Title: Dead body found in Pravara river was not identified

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here