Home Accident News अकोले: डंपरने दुचाकीस्वारांना उडवले; एकाचा मृत्यू

अकोले: डंपरने दुचाकीस्वारांना उडवले; एकाचा मृत्यू

Breaking News | Akole Accident: एका दुचाकीला उडविले. त्यामुळे या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला.

Dumper blows up bikers Accident death of one

भंडारदरा : वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरने चिचोंडी येथे नुकतेच एका दुचाकीला उडविले. त्यामुळे या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भंडारदऱ्याच्या रिंगरोडला सिमेंटी करणाचे काम सध्या चालु असून त्या ठिकाणाहुन वाळू खाली केल्यानंतर परत माघारी फिरत असताना चिचोंडी गावाजवळ (एम.एच. १५ जे.क्यु. ४५५५) क्रमांकाच्या रिकाम्या डंपरने एका दुचाकीवरील दोघांना जोराची धडक दिली.

या धडकेमध्ये चिचोंडी येथील संतोष किसन मध्ये हा युवक जागीच मयत झाला असून सचिन तुकाराम मध्ये हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात इतका मोठा होता की, मयत झालेला संतोष हा काही काळ गाडीच्या टायर खाली पडून होता. अपघात झाल्यानंतर सदर डंपरचा चालक हा पळून गेला असून डंपर राजूर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

याप्रकरणी राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी अपघाताचा पंचनामा केला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कावळे, सचिन शिंदे, दिलीप डगळे, अशोक काळे हे पुढील तपास करीत आहे.

Web Title: Dumper blows up bikers Accident death of one

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here