Home अहमदनगर अहमदनगर: ओढ्यात एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ

अहमदनगर: ओढ्यात एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ

Ahmednaagr News: दगडखाणी जवळ पाटील ओढ्यात एका तरुणाचा मृतदेह (Dead body) दोरीच्या साहाय्याने फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ.

Dead body of a young man was found in the stream

राहुरी : वडनेर परिसरातील तांभेरे रस्त्यालगत असलेल्या जगताप कन्ट्रक्शनच्या दगडखाणी जवळ पाटील ओढ्यात एका तरुणाचा मृतदेह दोरीच्या साहाय्याने फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली.

मिलिंद सुरेश वाघचौरे (रा. पाटीलवाडी, कोल्हार, वय ३५) वर्षे या तरुणाने गळफास घेतल्याचे आढळले. मात्र या तरुणाने गळफास घेतला नसून त्याचा कोणीतरी घातपात केल्याचा संशय परिसरातील नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे. सदर घटना दि. १५ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. पोलिस पथकाने मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. घटना घडलेल्या ठिकाणी मयताची दुचाकी व जेवणाचा डबा आढळून आला. ही घटना मुरूम उत्खननावरून झाली असल्याची परिसरात चर्चा आहे.

Web Title: Dead body of a young man was found in the stream

See Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here