Home अकोले शेतात कांदा झाकण्यासाठी गेले असता तेथेच घात, अकोलेत वीज कोसळून चार शेळ्यांचा...

शेतात कांदा झाकण्यासाठी गेले असता तेथेच घात, अकोलेत वीज कोसळून चार शेळ्यांचा जागीच मृत्यू

Ahmednagr News: वीज पडून (lightning strike) एकाचा मृत्यू, अकोलेत शेळ्या चारत असताना अचानक वीज कोसळून चार शेळ्यांचा जागीच मृत्यू.

died due to lightning, four goats died on the spot due to sudden lightning strike

अहमदनगर | अकोले: जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने थैमान घातले. नगर तालुक्यातील रुईछत्तिशी येथील एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला, तर अकोले तालुक्यात निंब्रळ येथे वीज पडून चार शेळ्यांचा मृत्यू झाला, तसेच गारपीट, वादळी वाऱ्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले.

शेतात गेले अन् वीज पडली रुईछत्तिशी येथील शेतकरी अशोक विठाबा गोरे (वय ४५) हे आपल्या शेतात कांदा झाकण्यासाठी गेले असता अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

शनिवारी (दि. १५) दुपारी जोरदार वादळी वाऱ्यासह पावसास सुरुवात झाली. त्यासोबत गारपीटही झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा, टोमॅटो, भाजीपाला, झेंडू, शेवंती, द्राक्षे, डाळिंब, अशा पिकांचे मोठे नुकसान झाले. वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. काही ठिकाणी विजेचे खांब कोसळले, तर काही ठिकाणी वीज तारा तुटल्या. त्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला.

अकोले तालुक्यातील समशेरपूर, टाहकारी, सावरगाव पाट, इंदोरी, भोडी, निंब्रळ, निळवंडे, नवलेवाडी परिसरात विजेच्या कडकडाटासह अवकाळी बरसला, जोरदार गारपीट झाली. बोर- चिंचोक्यापेक्षा मोठी गार होती. कांदा व भाजीपाला, झेंडू, शेवंती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास निंब्रळ येथील देवराम उमा पथवे हे निळवंडे रोडलगत वंडेकर वस्तीजवळ शेळ्या चारत असताना अचानक वीज कोसळून चार शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर काही शेळ्या जखमी झाल्याची घटना घडली. आमदार डॉ. किरण लहामटे यांनी गारपिटीचा आढावा घेतला असून, नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना महसूल प्रशासनास दिल्या आहेत.

Web Title: died due to lightning, four goats died on the spot due to sudden lightning strike

See Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here