Home क्राईम गोणीत आढळला तरुणीचा मृतदेह,  तरुणीची हत्या करून हात पाय तोडून…

गोणीत आढळला तरुणीचा मृतदेह,  तरुणीची हत्या करून हात पाय तोडून…

Crime News: मुंबईत वरळी सी फेसवर एका गोणीत तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने  खळबळ उडाली आहे.  या तरुणीची  अद्याप ओळख पटलेली नाही. पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Dead body of a young woman was found in a sack

मुंबई: मुंबईत वरळी सी फेसवर एका गोणीत तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने  खळबळ उडाली आहे.  या तरुणीची  अद्याप ओळख पटलेली नाही. तरुणीचे हात पाय तोडून तिच्या मृतदेह हा गोणीत बांधण्यात आला होता. ही तरुणी १८ ते २० वर्ष वयाची असून या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वरळी सी लिंकवर एक गोणी तरंगतांना येथील स्थानिक नागरिकांना आढळली. त्यांना ती संशयास्पद आढळल्याने या बाबतची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी आले असता त्यांना एक गोणी दोरीच्या साह्याने बांधलेली आढळली. दरम्यान, त्यांनी गोणी उघडून पाहिली असता त्यात एका तरुणीचा मृतदेह आढळला. या तरुणीचे हात आणि पाय तुटले होते. दरम्यान, या तरुणीची हत्या करण्यात आली असून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या हेतूने तिचा मृतदेह गोणीत टाकून समुद्रात फेकून देण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. दरम्यान, या तरुणीची ओळख पटलेली नाही. या तरुणीचे अंदाजे वय हे २० ते ३० दरम्यान आहे. या प्रकरणी वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Dead body of a young woman was found in a sack

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here