Home अहमदनगर अहमदनगर: कालव्यात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

अहमदनगर: कालव्यात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

Ahmednagar News: कॅनॉलमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह तरंगलेल्या अवस्थेत आढळला.

The dead body of an unknown person was found in the canal

श्रीरामपूर:  श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर कारखाना समोरील परिसरातील कॅनॉलमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह तरंगलेल्या अवस्थेत आढळला. जमलेल्या ग्रामस्थांनी कामगार पोलीस पाटील चंद्रकला यशवंत गायधने यांना घटनेची माहिती दिली. संजय बाजीराव गायधने यांनी सदर घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली.

पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष परदेशी, पो. कॉ. प्रविण कांबळे, गृहरक्षक दलाचे राजेंद्र देसाई, पोलीस मित्र गणेश गायकवाड हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाण्याबाहेर काढून रुग्णवाहिकेमधून शवविच्छेदनासाठी पाठविला. मृतदेह हा अनोळखी पुरुष जातीचा असून सदर व्यक्तीचे अंदाजे वय 50 ते 55 दरम्यान असल्याचे दिसून आले. सदर इसमाची उंची पाच फूट तसेच केस अर्धवट काळे पांढरे आहे.

त्याने अंगामध्ये सँन्डो बनियन, काळी पांढरी रेषा असलेला शर्ट तसेच राखाडी रंगाची पॅन्ट अंगामध्ये परीधान करून उजव्या हातामध्ये दोरा बांधलेला असल्याचा आढळून आला आहे.

घटनास्थळी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पीएसआय सोळुंखे, पोलीस हवालदार रघुनाथ खेडकर यांनी भेट दिली. तरी अज्ञात व्यक्तीविषयी माहिती अगर ओळख पटविण्यासाठी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: The dead body of an unknown person was found in the canal

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here