Home अकोले अकोले: डोंगराच्या कडेला अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला

अकोले: डोंगराच्या कडेला अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला

Akole news: एका डोंगराच्या कडेला एका २० ते २५ वर्षे वयाच्या अनोळखी महिलेचा मृतदेह आढळुन आला.

Dead body of an unknown woman was found on the side of the mountain

Ahmednagar | Akole News:  अकोले तालुक्यातील कातळापूर शिवारात एका डोंगराच्या कडेला एका २० ते २५ वर्षे वयाच्या अनोळखी महिलेचा मृतदेह आढळुन आला आहे.

मृतदेहाचे वर्णन:

महिलेचा बांधा मध्यम, अंगात टॉप घातलेला, छातीपर्यंत बदामी रंगाचा व छातीपासुन खाली गडद निळ्या रंगाचा व डाव्या बाजुस फाटलेला, त्याला पिन लावलेली तसेच पांढऱ्या धाग्याने शिवलेला, टॉपला छातीवर पत्राचे दोन मोठे पांढऱ्या रंगाचे बटन, लेगीन्स तांबुस रंगाची, कपाळावर डाव्या बाजुस बारीक जखम झालेली आहे. उजव्या कानात सोनेरी रंगाची रिंग, दोन्ही हातात लाल रंगाच्या बांगड्या, दोन्ही पायात पांढऱ्या रंगाच्या तोरड्या आहेत. पायांच्या बोटात जोडवे, डाव्या हाताच्या दंडावर जुन्या जखमेचे व्रण, एक ओढणी – दोन्ही बाजुस काळे पट्टे व मधल्या बाजुस लाल- निळा- नारंगी रंग असलेली, बाजुलाच गुलाबी रंगाची पर्स, एक सँडल असे या मृतदेहाचे वर्णन आहे.

राजूर पोलिसांचे संपर्क साधण्याचे आवाहन:

कुणाला या महिलेविषयी काही माहिती असल्यास राजुर पोलिस स्टेशनला संपर्क साधण्याचे आवाहन राजुर पोलिसांनी केले आहे. राजूर पोलीस ओळख पटविण्याचे काम करीत असून याप्रकरणी राजुर पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक शेख करत आहेत.

Web Title: Dead body of an unknown woman was found on the side of the mountain

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here