धक्कादायक! न्यायालयाच्या परिसरातच अटकेतील आरोपीवर गोळीबार
Satara Crime: न्यायालयाच्या परिसरातच अटकेत असलेल्या आरोपींवर गोळीबार (Firing) झाल्याची धक्कादायक घटना.
सातारा : सातारा जिल्ह्यामधील वाई तालुक्यामध्ये भर दिवसा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. न्यायालयाच्या परिसरातच अटकेत असलेल्या आरोपींवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाई न्यायालय परिसरामध्ये कुविख्यात गुंड अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव निखील आणि अभिजीत शिवाजी मोरे यांच्यावर हा गोळीबार करण्यात आला. न्याय मंदिर परिसरात गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली होती.
वाई मेनवली येथील हॉटेल मालकास खंडणी मागितल्या प्रकरणी अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव, निखिल आणि अभिजीत शिवाजी मोरे अटकेत आहेत. खंडणी आणि दरोडा घातल्याप्रकरणी तिघांना पोलिसांनी कळंबा कारागृहातून अटक केली होती. त्यानंतर आरोपींना दोन दिवसांची न्यायालीयन कोठडी सुनावण्यात आली होती.
या आरोपींना वाई न्यायालयाच्या परिसरात दोघांना नेत असताना अज्ञातांनी गोळीबार केला. दोन फायर झाल्या मात्र कोणालाही काही दुखापत झाली नाही. पोलीस आरोपींना नेत असताना त्यांच्यावर अशा प्रकारे हल्ला झाल्याने पोलिसांचा काही धाक राहिला नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अज्ञात हल्लेखोर कोण याबाबत पोलीस तपास करीत आहे.
दरम्यान, गोळीबार होताच सर्वत्र धावपळ उडालेली घटनेची माहिती समजताच वाई पोलिसांनी न्यायालयाच्या दिशेने धाव घेतली.
Web Title: Firing at the accused in the court premises
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App