Home अहमदनगर नदीपात्रात आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह

नदीपात्रात आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह

Ahmednagar | Kopargaon News: तरुणाचा मृतदेह (Dead body) आढळून आल्याने उलट सुलट चर्चेला उधाण.

Dead body of an unknown youth was found in the riverbed

कोपरगाव: कोपरगाव शहरापासून जवळच असलेल्या जेऊर पाटोदा हद्दीत गोदावरी नदी पत्राच्या कडेला अंदाजे ३५ वयाच्या पुरुष जातीचा तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  

घटनास्थळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पो.हे.कॉ.के.ए.जाधव यांनी भेट दिली. दरम्यान गोदावरी नदीस नुकताच पूर येऊन गेला आहे. अज्ञात तरुणांचा पाय घसरून तो पडला असावा व नदीत वाहत आला असावा, असा कयास व्यक्त करण्यात येत आहे. हा अपघात की खून याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे .

याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. याप्रकरणी अधिक  तपास पोलीस निरीक्षक देसले करीत आहेत.

Web Title: Dead body of an unknown youth was found in the riverbed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here