Home अहमदनगर अल्पवयीन मुलीस फूस लावून नेले पळवून

अल्पवयीन मुलीस फूस लावून नेले पळवून

Shrirampur News: नातेवाईक येथे सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही.

a minor girl was lured and taken away

श्रीरामपूर: अल्पवयीन मुलीस कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना तालुक्यातील शिरसगाव येथे घडली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर  अल्पवयीन मुलगी ही बोरावके महाविद्यालयात शिक्षण घेत होती. सकाळच्या दरम्यान शिरसगाव येथून महाविद्यालयात परिक्षेची चौकशी करून येते असे सांगून कॉलेजला जाण्यासाठी गेली असता ती सायंकाळपर्यंत घरी परतलीच नाही. तिचा नातेवाईक, मित्र-मैत्रीणी, तसेच बाहेरगाव येथील नातेवाईक येथे सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही. पुणे येथे शिक्षण घेत असलेल्या तिच्या भावाकडे व मावशीकडेही चौकशी केली असता तेथेही ती मिळून आली नाही.

तिला कोणीतरी कशाचे तरी अमिष दाखवून फूस लावून पळवून नेले असल्याचे तिच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: a minor girl was lured and taken away

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here