Home क्राईम संगमनेर: अभियांत्रिकी महाविद्यालयातील तरुणाचा मृतदेह, पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल

संगमनेर: अभियांत्रिकी महाविद्यालयातील तरुणाचा मृतदेह, पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल

Sangamner Murder Crime: दोन दिवसांत पोलिसांनी या खुनाच्या  गुन्ह्याचा उलगडा करावा अशी मागणी अकोले तालुक्यातील जनतेने केली आहे.  

Dead body of engineering college youth, case of murder registered 

संगमनेर: शहरालगतच्या सुकेवाडी रस्त्यावरील पुनर्वसन कॉलनीजवळ असलेल्या नाल्यात शुक्रवारी सकाळी सापडलेल्या मृतदेहाची ओळख निश्चित करण्यात पोलिसांना यश मिळाले असले तरी, या तरुणाच्या मारेकऱ्यांना शोधण्यात अद्याप यश आलेले नाही. मात्र शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात मृताच्या आतेभावाने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमनेरच्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या संकेत सुरेश नवले याचा मृतदेह पोलिसांना शहरालगतच्या पुनर्वसन कॉलनीशेजारी असलेल्या एका नाल्यात आढळून आला होता. घातपाताचा संशय असल्याने सुरुवातीला अनोळखी असणाऱ्या या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम पोलिसांना करावे लागले. त्यासाठी पोलिसांनी समाज माध्यमांचा वापर केल्याने मृतदेहाची ओळख पटविणे सोपे गेले.

हा मृतदेह संकेत नवले याचा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याच्या मारेकऱ्यांचा शोध लावण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागले आहे. शहर पोलीस आणि पोलीस उपाधीक्षक यांची स्वतंत्र पथके खुनाचा उलगडा करण्याच्या कामाला लागली आहे.

दरम्यान शहर पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री साडेआठ वाजता मामे भाऊ संकेत सुरेश नवले याचा कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी त्याच्या डोक्यात कशाने तरी मारून त्याला गंभीर जखमी करत ठार मारले. अशा आशयाची फिर्याद तेजल शिवाजी गुंजाळ रा. धांदरफळ बुद्रुक ता. संगमनेर या तरुणाने नोंदविली आहे. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे

दरम्यान नवले याचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. त्यामुळे मारेकर्यांचा शोध लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. दोन दिवसांत पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा करावा अशी मागणी अकोले तालुक्यातील जनतेने केली आहे.

Web Title: Dead body of engineering college youth, case of murder registered 

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here