Home औरंगाबाद आईने पोटच्या मुलीला हॉटेल मालकासोबत अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याची खळबळजनक  घटना

आईने पोटच्या मुलीला हॉटेल मालकासोबत अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याची खळबळजनक  घटना

Aurangabad Crime:  पैशांसाठी आईने आपल्या १७ वर्षीय मुलीला हॉटेल मालकाबरोबर संबंध (immoral relationship)ठेवण्यास सांगितले.

mother forcing her stepdaughter to have an immoral relationship with a hotel owner

औरंगाबाद: औरंगाबादमध्ये मातृत्वाला काळीमा फासणारी घडली आहे. आईने आपल्या पोटच्या १७ वर्षीय मुलीला ७० वर्षीय हॉटेल मालकासोबत अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आईने मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार केल्यानंतर या धक्कादायक घटनेचा खुलासा समोर आला आहे. सदर घटनेत पोलिसांनी आई विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की,   औरंगाबाद येथील सिल्लोड तालुक्यातील सारोळा येथे ही घटना घडली आहे. पीडितेची आई सलीम मलिक या ७० वर्षीय हॉटेल मालकाच्या हॉटेलवर काम करत होती. पैशांसाठी आईने आपल्या १७ वर्षीय मुलीला हॉटेल मालकाबरोबर संबंध ठेवण्यास सांगितले. सुरुवातीला मुलीने आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. मात्र नंतर सतत आईने मुलीला असे करण्याचा तगादा लावला.

Business Idea | शेतीसंबंधित हा व्यवसाय सुरु करून दर दिवस हजारोंची कमाई करण्याची संधी

मुलीला हे मान्य नव्हते तिचे राहुल‌ निंभोरे या मुलावर प्रेम होते. त्यामुळे तिने आईला हॉटेल मालकाबरोबर संबंध ठेवण्यास नकार दिला. मुलीने नकार दिल्याने आईने तिला त्रास द्यायला सुरुवात केली. रोजच्या त्रासाला कंटाळून मुलगी घर सोडून प्रियकराबरोबर पळून गेली. त्यावेळी आईने मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार औरंगाबाद पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली.

Web Title: mother forcing her stepdaughter to have an immoral relationship with a hotel owner

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here