Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: तरुणाचा मृतदेह शेततळ्यात आढळून आल्याने खळबळ

अहमदनगर ब्रेकिंग: तरुणाचा मृतदेह शेततळ्यात आढळून आल्याने खळबळ

Ahmednagar  | Rahuri: सुरक्षा कर्मचारी असलेल्या तरुणाचा मृतदेह (Dead body) आढळल्याने परिसरात खळबळ.

  

राहुरी: राहुरी तालुक्यातील डिग्रस येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे.  दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या डिग्रस येथील 30 वर्षीय सुरक्षा कर्मचारी असलेल्या तरुणाचा मृतदेह आज राहुरी विद्यापीठातील त्याच्या घराजवळील शेततळ्यात आढळून आल्याने परिसरात पएकच खळबळ उडाली आहे.

राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील 30 वर्षीय सचिन इंद्रभान गावडे हा तरूण महात्मा फुले कृषी विद्यापीठात सुरक्षा कर्मचारी म्हणून कार्यरत होता. त्याने बेपत्ता होण्याच्या दिवशी रात्री साडे आकराच्या सुमारास तो कामावरून घरी जाण्यासाठी निघाला होता. परंतू तो घरी पोहोलाच नाही. त्याचे नातेवाईक रात्रीपासून त्याचा शोध घेत होते. आज दि. 30 सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान त्याच्या घरापासून सुमारे 100 फूट अंतरावर नारळाच्या बागे जवळील शेततळ्याजवळ त्याची मोटरसायकल, मोबाईल, बूट संशयास्पद आढळून आल्याने मुळानगर येथील संतोष पवार, नामदेव पवार, अशोक गायकवाड, संतोष गायकवाड या तरूणांनी शेत तळ्याच्या पाण्यात त्याचा शोध घेतला. बराच वेळ शोध घेतल्या नंतर शेततळ्यात त्याचा मृतदेह मिळून आला.

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. या घटनेबाबत सायंकाळी उशीरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Web Title: Dead body of the young man was found in the farm

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here