Home क्राईम संगमनेर: घाटात चाकूचा धाक दाखवून दुचाकीस्वारास लुटले

संगमनेर: घाटात चाकूचा धाक दाखवून दुचाकीस्वारास लुटले

Sangamner Robbed:  अनोळखी इसमानी अडवून त्यांच्या गळ्यातील चांदीची चैन, ब्रेसलेट, रोख रक्कम व मोबाईल चाकू दाखवून बळजबरीने काढून घेऊन पसार.

bike rider was robbed at knife point in the ghat

संगमनेर: संगमनेर पुण्याहून संगमनेरच्या दिशेने येणाऱ्या एका – दुचाकीस्वाराची दिशाभूल करुन त्याला जुन्या चंदनापुरी घाटाच्या दिशेने पाठवित चौघांनी त्यांचा पाठलाग करून लुटण्याची घटना नुकतीच घडली. याबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रिन्स ललित शर्मा (वय २२, रा. कासारवाडी, भोसरी, जि. पुणे) हे पुणे कडून संगमनेरकडे येत असताना बुधवारी एका इसमाने शर्मा यांना पुढे रोडला ट्राफिक जाम आहे. म्हणून तुम्ही जुने चंदनापुरी घाटाने जा, असे सांगितल्याने शर्मा हे त्यांच्या दुचाकीवरून जुने चंदनापुरी घाटातून संगमनेरकडे जात असताना गणपती मंदिराचे कॉर्नरला त्यांना चार अनोळखी इसमानी अडवून त्यांच्या गळ्यातील चांदीची चैन, ब्रेसलेट, रोख रक्कम व मोबाईल चाकू दाखवून बळजबरीने काढून घेऊन पसार झाले.

Web Title: bike rider was robbed at knife point in the ghat

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here