Home संगमनेर संगमनेर: घाटात गोवंश मास तस्करी करणारी कार पेटली

संगमनेर: घाटात गोवंश मास तस्करी करणारी कार पेटली

Sangamner Burning Car: मारुती स्विफ्ट कारना सायखिंडी शिवारात कन्हे पाटात अचानक भीषण आग (fire)लागली.

Sangamner A car smuggling beef caught fire in the ghat

संगमनेर:  रात्रीच्या वेळी पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कन्हे घाटात बर्निंग कारचा थरार समोर आला खरा पण ती कार गोवंश मास घेऊन जाणारी मारुती स्विफ्ट कार असल्याने संगमनेर शहरातील गोवंश हत्या पुन्हा एकदा उघडकीस आली असून कत्तलखाने बंद नसल्याचे समोर आले आहे. जळल्या गाडीमधून गोवंश मांसाची दुर्गंधी पसरली होती. या गाडीवर अज्ञात व्यक्तीनी पाणी मारून गाडी वयाचा प्रयत्न केला गाडीतील अजात मांस तस्कर मात्र गायब झाले आहेत.

काल रात्री (बुधवार) संगमनेर येथून नाशिक कडे जाणाऱ्या सिल्वर रंगाच्या (एम एच ४३ एएफ 9598) नंबरच्या मारुती स्विफ्ट कारना सायखिंडी शिवारात कन्हे पाटात अचानक भीषण आग लागली ही आग लागल्यानंतर आतले अज्ञात वाहनचालक व तस्कर गायब झाले ही आग कुणीतरी येऊन विझविली देखील मात्र या गाडीत होते गोवंश कत्तल केलेले मांस, गोवंश कल्लीच्या मांसाने संपूर्ण गाडी भरलेली होती जवळजवळ ते ६ किलो मास या गाडीत असावे असा अंदाज आहे ही गाडी जळून खाक झाली. हे गोवंश मास नाशिककडे विक्रीला नेणान्या त्या कारमधील अज्ञात लोक मात्र गायब झाले आहेत

बजरंग दलाच्या संगमनेर शहरातील कार्यकत्यांना ही माहिती समजताच रात्री त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली रात्री अकरा वाजेपर्यंत त्याठिकाणी ते होते या संदर्भात पोलिसांना कळविण्यात आले होते परंतु रात्री अपना वाजेपर्यंत पोलीस तिकडे आले नव्हते शेवटी वैतागून है कार्यकर्ते घरी आले.

रात्री उशिराने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात या सदर्भाने गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी अज्ञात वाहन चालक आणि गोवंश तस्करावर गुन्हा दाखल केला आहे पोलीस हेड कॉन्स्टेबल ऑकार रमेश शेंगाळ यांनी फिर्याद दिली आहे तसेच या ठिकाणी सदर कम मध्ये अर्धवट जळालेले गौमांस असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे

वेळोवेळी पोलिसांना सांगून ही पोलीस साधी दखलही घेत नसल्याने कार्यकल्पांनी संताप व्यक्त केला आहे. बजरंग दलाचे कुलदीप ठाकूर, सचिन कानकाटे याना घाटात एक मारुती कार जळत असल्याचे निरोप आले. या गाडीमध्ये गोवंश मास पूर्णपणे भरलेले असल्याची माहिती त्यांना मिळाली तातडीने ते घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत गाडी पूर्णपणे जळून खाक झालेली होती आणि गाडी कोणीतरी येऊन विझविण्याचा प्रयत्न देखील केला होता गाडीवर पाणी मारण्यात आलेले होते मात्र ही गाड़ी कोणी विझविली हे समजू शकले नाही संबंधित कार्यकत्यांनी गाड़ीचे चोहोबाजूनी फोटो घेतले जातील फोटो देखील विदारक होते संपूर्ण गाडीमध्ये गोवंश मांस भरलेले होते गाडीने अचानक पेट घेतला असावा आणि या मांसाची वाहतूक व विक्री करणारे तस्कर पळून गेले असावेत असा अंदाज आहे

ठाकूर यांनी पोलिसांना फोन लावून ही माहिती कळविली रात्री अकरा वाजेपर्यंत घटनास्थळी त्या ठिकाणी तो पर्यंत पोलीस नाहीत असे त्यांनी सांगितले

यापूर्वीच स्विफ्ट कार मधून नादुर शिंगोटे निर्माण मार्गावर गौमास वाहतूक व विक्री साठी जात असताना पोलिसांना सापडून आले गर तालुका पोलिसानी ही माहिती लपवण्याचा प्रयत्न केला अपघात झाल्यामुळे ही घटना उघड झाली आता पुन्हा एकदा स्विफ्ट कार जळाल्याने गौमांस तस्करी उघड झाली आहे आणि तेही तालुका पोलिसांच्या हद्दीत तस्करांना पाठीशी घालीत असल्याचा स्पष्ट आरोप आता होऊ लागले आहे

Web Title: Sangamner A car smuggling beef caught fire in the ghat

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here