Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग!  आढळला गादीत गुंडाळलेला मृतदेह

अहमदनगर ब्रेकिंग!  आढळला गादीत गुंडाळलेला मृतदेह

Breaking News | Ahmednagar:  साठवण तलावाच्या कंपाऊंड जवळ गादीमध्ये गुंडाळलेला कुजलेल्या अवस्थेत अन- ोळखी तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ.

dead body was found wrapped in a mattress

राहता: राहाता येथील कातनाला साठवण तलावाच्या कंपाऊंड जवळ गादीमध्ये गुंडाळलेला कुजलेल्या अवस्थेत अन- ोळखी तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेहाचे जा गेवरच शवविच्छेदन करून नगरपरिषद व पोलिस प्रशासनाने दफन केला. मृताची ओळख अद्यापही पटलेली नव्हती.

शनिवारी सकाळी नगरपरिषदेचे पाणीपुरवठा विभाग प्रमुख अशोक साठे तसेच आरोग्य प्रमुख विजयकुमार आवारे व रवींद्र बोठे यांना पाणीपुरवठा फिल्टर हाऊसचे पंप चालक रघुनाथ जारे यांनी तलावाच्या कंपाउंड जवळ एका गाठोडे असून त्याचा वास येत आहे असल्याचे सांगितले. नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी गाठोडे सोडले असता त्यात हाडे दिसली. नगरपरिषद कर्मचारी साठे यांनी तात्काळ पोलिसांना कळविले.

पोलिस निरीक्षक काकड यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. कुजलेल्या अवस्थेत २५ ते ३० वर्षाचा तरुणाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे राहाता ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी यांनी जागेवरच मृतदेहाचे शवविच्छेदन केले. त्यानंतर नगर परिषदेचे कर्मचारी व पोलिसांनी जेसीबीच्या साह्याने खड्डा खोदून मृतदेह दफनविधी केला. मृतदेह कोणाचा व कोणी आणून टाकला याची तपास पोलिस करत आहेत.

Web Title: dead body was found wrapped in a mattress

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here