Home अहमदनगर विहिरीच्या पाण्यात बुडून एकुलता एक मुलाचा मृत्यू

विहिरीच्या पाण्यात बुडून एकुलता एक मुलाचा मृत्यू

Breaking News | Ahmednagar: विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या ११ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना.

Death of an only child after drowning in well water

नेवासा : तालुक्यातील वाकडी येथे पाच जणांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी दुपारी खडका गावात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या ११ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना झाली. तब्बल चार तासांनी मुलाचा मृतदेह हाती लागला.

सध्या मुळा धरणातून शेतीकरिता पाणी सोडण्यात आले आहे. तालुक्यातील खडका भागातही पाटपाणी सुरू आहे. खडका गावाच्या उत्तरेला जुन्या नगर रस्त्यावर कोतकर यांची विहीर आहे. पाटपाणी सुरू असल्याने विहिरीचे पाणी वाढले आहे. याच विहिरीत कृष्णा डाके यांच्या वस्तीवरील मजुराचा मुलगा शाम प्रकाश कांबळे (वय ११) व इतर दोन-तीन मुले पोहण्यासाठी शनिवारी (दि.१३) दुपारी गेले होते. विहिरीत उडी मारल्यानंतर शाम पुन्हा वर आलाच नाही. या भीतीने इतर मुलांनी आरडाओरड सुरू केली. आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही तरूणांनी बराच वेळ विहिरीत मुलाचा शोध घेतला. शेतकऱ्यांनी पाणी उपशासाठी वीजपंप टाकला. पाणी उपसा होत असला तरी पाटाच्या पाण्याचा पाझर होतच असल्याने शोधकामात अडथळा येत होता. अखेर संभाजीनगरच्या आपत्ती निवारण व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आले. सायंकाळी पाच वाजता शामचा मृतदेह मिळून आला. हे शेतमजूर लातूर भागातील असून, शवविच्छेदनानंतर नेटूर (जि. लातूर) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. पोलिस पाटील सुभाष भांगे यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली.

प्रकाश कांबळे यांना दोन मुली व शाम एक मुलगा होता. अनेक दिवसांपासून लातूर परिसरातील कांबळे कुंटुंबीय खडका भागात मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत आहेत. शाळा सुटल्यावर काही मुले विहिरी जवळ होती. त्यामुळे शामदेखील त्वरित घरून विहिरी कडे आला अन् काळाने झडप घातली.

Web Title: Death of an only child after drowning in well water

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here