Home अहमदनगर श्रीरामपुरात रेल्वेखाली तरुणाचा मृत्यू, घात की अपघात

श्रीरामपुरात रेल्वेखाली तरुणाचा मृत्यू, घात की अपघात

Shrirampur Accident: मृतदेह (Death Body) नेवासा रोडवर असणार्‍या ओव्हर ब्रिजजवळील रेल्वे रूळावर आढळून आला.

Death of a young man under the train in Srirampur, hit or miss

श्रीरामपूर:  श्रीरामपुरातील ओव्हर ब्रिजजवळ रात्रीच्या वेळी एका 22 वर्षीय पदवीधर तरुणाचा रेल्वे रूळावर मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.  हा मयत तरुण हा सूतगिरणी रोडवर राहणारा असून त्याची मोटारसायकल नेवासा रोड येथील भुयारी पुलाजवळ आढळल्याने सदर तरुणाचा घात की अपघात? याबाबत विविध तर्क वितर्क लढविले जात असून तर्क वितरकांना उधाण आले आहे.

अक्षय सुभाष दांगट असे या मयत  तरुणाचे नाव आहे. तो श्रीरामपुरातील संगमनेर रोडवर मेसचा व्यवसाय करत होता. त्याचा मृतदेह नेवासा रोडवर असणार्‍या ओव्हर ब्रिजजवळील रेल्वे रूळावर आढळून आला. त्याच्या अंगावर जखमा झालेल्या होत्या. सदर तरुणाचा मृतदेह ओव्हर ब्रिजच्या जवळील रेल्वे रूळावर आढळला तर त्याची मोटारसायकल इतक्या अंतरावर नेवासारोडवरील रेल्वे अंडरग्राउंंड पुलाजवळ कशी? असा सवाल सदर तरुणाच्या अंत्यविधी प्रसंगी लोकांच्या चर्चेमधून विचारला जात होता. त्यामुळे सदर तरुणाच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत पोलिसांनी कसून तपास करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Death of a young man under the train in Srirampur, hit or miss

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here