Home अहमदनगर महाविद्यालयीन विद्यार्थिनीस फूस लावून पळविले

महाविद्यालयीन विद्यार्थिनीस फूस लावून पळविले

Shrirampur Crime: एका १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीस फूस लावून पळवून (abducted) नेण्याचा प्रकार समोर.

college student was seduced and abducted

श्रीरामपूर: बेलापूर येथून महाविद्यालयात शिक्षण घेत असणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीस फूस लावून पळवून नेण्याचा प्रकार समोर आला आहे.  याबाबत  श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत राहुरी तालुक्यातील चांदेगाव परिसरात मोलमजुरी करणार्‍या मुलीच्या वडिलांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहे की,  दि. 12 सप्टेंबर रोजी 7.45 ते सकाळी 11.30 च्या दरम्यान आपली 17 वर्षे 4 महिने वयाची बेलापूर येथील महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. लोटके करीत आहेत. नजीकच्या काळात बेलापुरातून अल्पवयीन मुलगी पळवून नेण्याची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे पालकवर्गात  चिंतेचे वातावरण आहे.

Web Title: college student was seduced and abducted

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here