Home अकोले प्रवरेला पूर, १६८४० क्युसेकने विसर्ग सुरु, सतर्कतेचा इशारा

प्रवरेला पूर, १६८४० क्युसेकने विसर्ग सुरु, सतर्कतेचा इशारा

Pravara Flood: भंडारदरातून 14931 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.

Paravara Flood Discharge of 16840 cusecs, warning of vigilance

अकोले: भंडारदरा पाणलोटक्षेत्रात जोरदार पाउस सुरु आहे. त्यामुळे विसर्गही वाढविण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे  मुळा धरणातही काल पाण्याची आवक वाढली आहे.

काल रात्री भंडारदरातून 14931 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. निळवंडेतून 16840 क्युसेकने पाणी सोडण्यात येत असून यात म्हाळुंगी नदीचे पाणी येऊन मिळत आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत.

11039 दलघफू क्षमतेचे हे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. पण अजूनही पाऊस कमी अधिक होत असल्याने त्या प्रमाणात प्रवरा नदीत विसर्ग वाढवण्यात आला आहे काल 11 हजार क्युसेकने विसर्ग सुरु होता. पण पाऊस सुरू झाल्याने हा विसर्ग पुन्हा वाढवण्यात आला आहे. काल दिवसभर अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या. भंडारदरात दिवसभरात पडलेल्या पावसाची नोंद 55 मिमी झाली आहे.

पाणलोटात पाऊस सुरूच असल्याने सायंकाळी 14117 क्युसेकने विसर्ग वाढविण्यात आला. त्यानंतरही पाण्याची आवक वाढल्याने सायंकाळी 6 वाजता तो 14931 क्युसेक पर्यंत नेण्यात आला. रात्री आठ वाजता त्यात आणखी वाढ करण्यात आली. तर निळवंडेतून प्रवरा नदीत 16840 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता. निळवंडेत सध्य 7992 दलघफू पाणी आहे. भंडारदरा पाणलोटात जोरदार पाऊस सुरू असल्याने सर्वत्र पाणीच पाणी असल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. मुळ धररणात पाण्याची आवक वाढली असून मुळा धरणातून गेटमधून 5000 क्युसेकने उजवा कालव्यातून 600 ने विसर्ग सोडण्यात आला आहे.

Web Title: Paravara Flood Discharge of 16840 cusecs, warning of vigilance

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here