Home अहमदनगर सैराटमधील प्रिन्सकडून नेवासा येथील तरुणाची फसवणूक, संगमनेरचा आरोपी अटकेत

सैराटमधील प्रिन्सकडून नेवासा येथील तरुणाची फसवणूक, संगमनेरचा आरोपी अटकेत

Cheated: मंत्रालयात नोकरी देण्याचे आमिष : आणखी तीन तरुणांनाही पोलिसांनी घेतले ताब्यात.

a young man from Nevasa is cheated by a prince from Sairat

राहुरी : मंत्रालयात नोकरीला लावून देतो, असे आमिष दाखवून एका तरुणाची पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना दि. ८ सप्टेंबर रोजी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या परिसरात घडली होती. या प्रकरणात आतापर्यंत तिघांना ताब्यात घेतले असून, या गुन्ह्यात सैराट चित्रपटातील सूरज पवार उर्फ प्रिन्स हा आरोपी असल्याचे तपासात समोर आले आहे.

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील महेश बाळकृष्ण वाघडकर (वय २५) या तरुणाबरोबर संबंधित फसवणूक करणाऱ्या इसमाने ओळख करून घेतली. त्यावेळी त्याने मुंबई येथे मंत्रालयात सामाजिक न्याय विभागात कक्ष अधिकारी म्हणून नोकरीस आहे असे सांगितले होते. तसेच वारंवार गोड बोलून त्याने महेश वाघडकर याचा विश्वास संपादन केला.

आमच्याकडे रिक्त पदासाठी जागा सोडतात त्या रिक्त पदावर तुझे काम करतो. पाच लाख रुपये भरावे लागतील. असे त्या इसमाने वाघडकरला सांगितले. सुरुवातीला दोन लाख रुपये घेतले. आणि नियुक्तीपत्र आल्यावर तीन लाख रुपये द्यावे लागतील असा व्यवहार ठरला.

दि. ८ सप्टेंबर रोजी त्या इसमाने  सकाळीच महेशला फोन करून ऑर्डर मिळाली असून पैसे घेऊन राहुरी विद्यापीठातील विश्रामगृहात येण्याचे सांगितले. महेश वाघडकर या तरुणाला संशय आल्याने त्याने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली.  पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना सविस्तर माहिती दिली.

पोलीस उप निरीक्षक सज्जन नान्हेडा, पोलीस शिपाई गणेश वाघडकर यांच्या पथकाने विद्यापीठ येथील गेस्ट हाउस परिसरात सापळा लावून दत्तात्रय अरुण शिरसागर याला ताब्यात घेतले. मात्र त्याचे साथीदार आकाश विष्णू शिंदे व इतर पसार झाले.

महेश वाघडकर याच्या फिर्यादीवरून आरोपी दत्तात्रय अरुण शिरसागर, वय ३१ व आकाश विष्णू शिंदे (रा. संगमनेर) तसेच त्याच्या इतर साथीदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील फरार आरोपी आकाश विष्णू शिंदे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने सांगितल्याप्रमाणे मंत्रालयाचे बनावट शिक्के बनविणारा संगमनेर येथील ओमकार नंदकुमार तरटे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस पथकाने त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, मंत्रालयाचे बनावट शिक्के बनविण्यासाठी सैराट चित्रपटातील प्रिन्स म्हणजे सूरज पवार हा आला होता. त्याने सैराट चित्रपटाचे डायरेक्टर नागराज मंजुळे यांच्याशी बोलणे करून देतो असे सांगून एका व्यक्तीला फोन लावून बोलणे करून दिले. ती व्यक्ती नागराज मंजुळे असल्याचे भासवत चर्चा केली. शिक्के हे कोणत्याही गैरवापराकरिता वापरणार नसल्याचे सांगून शिक्के बनवून द्या, असे सांगितले, अशी माहिती आरोपींनी दिली. पोलीस पथक आता सूरज पवार उर्फ प्रिन्स याला अटक करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सज्जन नाहेडा हे करीत आहेत.

Web Title: a young man from Nevasa is cheated by a prince from Sairat

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here