Home अहमदनगर अहमदनगर: पारवा पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू

अहमदनगर: पारवा पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू

Breaking News | Ahmednagar: पारवा पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा श्री काशीविश्वेश्वर मंदिराच्या ओवरीवरून पडल्याने जागीच मृत्यू (Death) झाल्याची घटना.

Death of a young man who went to catch Parva

कर्जत:  पारवा पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा श्री काशीविश्वेश्वर मंदिराच्या ओवरीवरून पडल्याने जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना कर्जत तालुक्यातील राशीन येथे सोमवारी सायंकाळी घडली. ज्ञानेश्वर (पिंटू) पोपट साळवे (वय ४२) मृताचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, राशीन ग्रामपंचायतीसमोर असलेल्या काशीविश्वेश्वर मंदिराच्या ओवऱ्यावरील कपारीत असणाऱ्या पारव्याला पकडताना पिंटू साळवे याचा तोल जाऊन तो खाली पडला. खाली असणाऱ्या दगडी पायरीवर त्याचे पडल्याने तो गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, आई-वडील, असा परिवार आहे. राशीन येथील सामाजिक कार्यकर्ते पोपट साळवे यांचा तो मुलगा होत.

Web Title: Death of a young man who went to catch Parva

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here