Home नांदेड नांदेड: नवजात बालकासह आईचाही मृत्यू, रुग्णालयात एकच आक्रोश

नांदेड: नवजात बालकासह आईचाही मृत्यू, रुग्णालयात एकच आक्रोश

Nanded Hospital Death :  एका मातेसह तिच्या नवजात बाळाचा मृत्यू (Death) झाला असल्याचे समोर.

Death of mother along with newborn child

Nanded: नांदेडच्या शासकीय रुग्णालयात  मृत्यूचे तांडव अद्याप सुरूच आहे. एका मातेसह तिच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे.

नांदेडच्या याच शासकीय रुग्णालयात 22 वर्षीय अंजली वाघमारे या महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी तिची प्रसूती झाली. महिलेची नैसर्गिक प्रसूती होऊन तिने मुलीला जन्म दिला. मात्र, शनिवारीच नवजात बाळाचा मृत्यू झाला. त्यांनतर,  महिलेची देखील प्रकृती बिघडत गेली आणि आज तिचा सुद्धा मृत्यू झाला. शनिवारपासून या महिलेवर उपचार सुरू असताना डॉक्टरांनी उपाचाराबाबत काही माहिती दिली नसल्याचा आरोप होत आहे.

शनिवारी संध्याकळी अंजली यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि रात्री एक ते दीडच्या सुमारास त्यांची सामान्य प्रस्तुती झाली. मुलगी झाली असून, बाळ व बाळाची आई सुखरूप असल्याचे माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली. दोन-तीन दिवसांत सुट्टी होईल या अपेक्षेने महिलेचे नातेवाईक रुग्णालयात थांबले होते.

दरम्यान, सर्व काही व्यवस्थित असतानाच शनिवारीच तुमच्या बाळाचा मृत्यू झाला असं म्हणत बाळाला घेऊन जाण्याचे डॉक्टर म्हणाले. विशेष म्हणजे या काळात बाळाला व बाळाच्या आईला लागणारी औषधी डॉक्टर लिहून देत होते आणि आम्ही ते बाहेरून आणत होतो. औषधाचा खर्च पन्नास हजाराच्या जवळपास झाला.पण एवढे करूनही आम्हाला अचानक बाळ दगावल्याची माहिती देण्यात आली. यामुळे आम्हाला धक्काच बसला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पत्नी व मुलगी गेल्याने अत्यंत दुखी झाल्याची प्रतिक्रिया महिलेचां पत्ती मंचक वाघमारे यांनी दिली आहे. या घटनेने रुग्णालयात एकच आक्रोश झाला. सर्वसामान्य कुटुंबातून आलेले परिवारास हा खर्च न परवडणारा आहे. त्यातच मुलगी व पत्नीही गेल्याने पतीने हंबरडा फोडला.

Web Title: Death of mother along with newborn child

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here