Home क्राईम गुंगीचं औषध पाजून तरुणीवर बलात्कार,  नराधमावर गुन्हा

गुंगीचं औषध पाजून तरुणीवर बलात्कार,  नराधमावर गुन्हा

Nagpur Crime News Marathi: गुंगीचं औषध देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape) करण्यात आल्याची घटना.

Rape of a young woman after taking gungi drug

नागपूर: नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुंगीचं औषध देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेकमध्ये ही घटना घडली असून या प्रकरणात पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याच्या अटकेची कार्यवाही सुरू झाली आहे. गणेश धुर्वे असं २० वर्षीय आरोपीचं नाव आहे. घटनेनंतर आरोपी नराधम फरार झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, , नागपूर जिल्ह्यातील रामटेक शहरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला गुंगीचं औषध देत गणेश धुर्वे या आरोपीने बलात्कार केला आहे. याशिवाय आरोपीने बलात्काराचे व्हिडिओ शूट करत पीडितेला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. पीडितेची आई आजारी होती, त्यावेळी पीडितेचे वडील आणि भाऊ रुग्णालयात डबा देण्यासाठी गेले होते. या संधीचा फायदा घेत गणेश धुर्वेने मुलीला गुंगीचं औषध देत बलात्कार केला आहे. त्यानंतर आता पीडितेच्या तक्रारीनंतर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर आरोपी गणेश धुर्वे फरार झाला असून आरोपीकडून त्याचा शोध घेतला जात आहे. आरोपीवर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती घेतली असून परिसरातील सीसीटीव्ही फूटेज चेक करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. या घटनेने नागपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Web Title: Rape of a young woman after taking gungi drug

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here