Breaking News | Akole: हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज असला, तरी मृत्यू (Death) कशामुळे झाला, हे शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार.
राजूर : तालुक्यातील मवेशी येथील (करवंददरा) येथे हळदी कार्यक्रमासाठी गेलेल्या १०० ग्रामस्थांना विषबाधा झाली असून त्यापैकी ५९ रुग्णांना तातडीने मवेशी, राजूर, कोहणे, समशेरपूर, खिरविरे रुग्णालयांत हलविण्यात आले होते.
मवेशी येथील विषबाधा प्रकरणात उपचार घेऊन घरी गेलेल्या एका वृद्ध महिलेचे शुक्रवारी (दि.१) सकाळी निधन झाले. वेणूबाई रामचंद्र भांगरे (वय ६२, रा. मवेशी, करवंद दरा) असे या महिलेचे नाव आहे.
त्यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज असला, तरी मृत्यू कशामुळे झाला, हे शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. याबाबत मवेशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सी. डी. भागवत म्हणाले, वेणूबाई या गुरुवारी सकाळी पोटात दुखत असल्याने त्यांना उलट्या झाल्या. मवेशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी त्या दाखल झाल्या होत्या. त्यांना बरे वाटत असल्याने त्यांना गुरुवारी (दि.२९) सायंकाळी डिस्चार्ज देण्यात आला. शुक्रवारी सकाळी उठल्यानंतर काही वेळाने त्यांना अचानक त्रास जाणवू लागला. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात मयत वेणूबाई यांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची राजूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Web Title: Death of poisoned woman
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study