Home संगमनेर संगमनेर: बिबट्याचा पुन्हा हल्ला, चौघे जखमी, भीतीचे वातावरण

संगमनेर: बिबट्याचा पुन्हा हल्ला, चौघे जखमी, भीतीचे वातावरण

Breaking News | Sangamner: बिबट्याने रस्त्याने जाणाऱ्या नागरिक व वाहनावर हल्ला करत चार जणांना जखमी केल्याची घटना.

Bibatya attack again, four injured, atmosphere of fear

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील मालदाड गावात बुधवारी रात्री दोघांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी (दि. १) पुन्हा बिबट्याने रस्त्याने जाणाऱ्या नागरिक व वाहनावर हल्ला करत चार जणांना जखमी केल्याचे समोर आले आहे.

मालदाड परिसरात बिबट्यांनी चांगलीच दहशत निर्माण केली आहे. गुरुवारी रात्री बिबट्याने वस्तीवरील शाळेजवळ ये-जा करणाऱ्या नागरिक व वाहनावर हल्ला करत चौघांना जखमी केले, तर एकाने वाहनाचा वेग वाढविल्याने तो बचावला. संजय प्रभाकर नवले (वय ४९), संतोष काटे (३४), पंढरीनाथ राऊत (६९), अल्केश नवले (२२), मेंगाळ (पूर्ण नाव समजू शकले नाही) व अन्य दोन युवकांवर या बिबट्याने हल्ला केला. जखमींवर ग्रामीण रुग्णालय घुलेवाडी, तर अन्य काहीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने मालदाडचे ग्रामस्थ भयभीत झाले आहे. वन विभागाने या बिबट्यांचा बंदोबस्त करा, अशी मागणी केली आहे.

संजय काटे म्हणाले, रस्त्यावर बिबट्याबरोबर झालेल्या झटापटीत पाठीला गंभीर मार लागला. दोघेही खोल खड्ड्यात पडल्याने त्यातून माझी सुटका झाली. बरोबर असणाऱ्याच्या हाताला जोराचा चावा घेत घायाळ केले. पंढरीनाथ राऊत म्हणाले, गुरुवारचा बाजार करून रात्री आम्ही दोघे गाडीवर जात असताना बिबट्या अंगावर धावून आला आणि मांडीला चावला. मित्राला मात्र इजा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. मेंगाळ यांना मादीने जखमी केल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. ही घटना वस्तीवरील बालवाडी शाळेजवळ घडल्याने येथील लहान मुलांचा जीव धोक्यात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वन विभागाने या भागात पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. परंतु वन विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.

Web Title: Bibatya attack again, four injured, atmosphere of fear

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here