Home Accident News अहमदनगर: दुचाकी झाडावर धडकल्याने युवकाचा मृत्यू; एक जखमी

अहमदनगर: दुचाकी झाडावर धडकल्याने युवकाचा मृत्यू; एक जखमी

Breaking News | Ahmednagar Accident:  दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झाडावर आदळून झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना.

Accident youth died after his bike hit a tree

शिर्डी: शहरात बुधवारी रात्री नांदुर्खी रोडवर झालेल्या दुचाकी अपघातात दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झाडावर आदळून झालेल्या अपघातात दुचाकीवरील साहिल सुदाम गोंदकर (वय २५) या तरुणाला डोक्याला जबर मार लागल्याने व अतिरक्तस्राव झाल्याने मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेला सत्यम कुहिले जबर जखमी झाला आहे.

अपघात होताच नागरिकांनी दोघांना तात्काळ साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या सत्यम यास पोटाला, डोक्याला व छातीला जबर मार लागल्याने पुढील उपचारासाठी नाशिक येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मयत साहिल गोदकर हा शिर्डी येथील हॉटेल व्यावसायिक व इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्रेते सुदाम चांगदेव गोंदकर यांचा मुलगा असून वसंत गोंदकर याचा तो पुतण्या आहे. या रोडवर या अगोदर देखील अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागले आहे.

Web Title: Accident youth died after his bike hit a tree

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here