Home नांदेड डीजेच्या तालावर नाचताना युवकाचा दुर्दैवी मृत्यू

डीजेच्या तालावर नाचताना युवकाचा दुर्दैवी मृत्यू

डीजेच्या तालावर नाचत असताना अचानक कोसळून युवकाचा जागीच मृत्यू (Death).

death of youth while dancing to DJ's beat

शिवणी | जि. नांदेड : लग्नात डीजेच्या तालावर नाचत असताना अचानक कोसळून मुत्येन्ना विश्वनाथ जामगेवाड (१९ रा. शिवणी ता. किनवट) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना २५ फेब्रुवारी रोजी घडली.

पार्डी, ता.मुधोळ (तेलंगणा) येथे शनिवारी लग्नाचा कार्यक्रम असल्याने, हा युवक चार दिवसांपूर्वी तिथे गेला होता. लग्नाच्या कार्यक्रमात डीजे लावल्याने तो रात्री नऊ वाजता डीजेच्या तालावर नाचत होता. पाहुणे मंडळी या युवकाचा नाचत असताना मोबाइलद्वारे व्हिडीओ काढण्यात मग्न होते. नाचत असताना अचानक हृदयविकाराचा झटका येऊन तो खाली कोसळला. आणि त्याची हालचाल बंद झाली.

Web Title: death of youth while dancing to DJ’s beat

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here