Home क्राईम सोडा पाजून अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

सोडा पाजून अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

Jalgaon Crime News: अल्पवयीन मुलीवर वेगवेगळ्या लोकांनी दबाव टाकून अत्याचार (abused) केल्याचा धक्कादायक प्रकार.

Gang rape of minor girl by drinking soda

जळगाव: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वेगवेगळ्या लोकांनी दबाव टाकून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

७ जानेवारी रोजी नितू ऊर्फ जोया राजू बागडे (रा. जळगाव), ज्योती चंद्रकांत सरदार आणि चंद्रकांत शंकर सरदार ( दोघे रा. आनंदवाडी, चाळीसगाव) यांनी अल्पवयीन मुलीला चाळीसगाव येथे बोलावून तिला सोडा पाजून वेगवेगळ्या लोकांसोबत अनैतिक कृत्य करण्यास भाग पाडले आणि घरी पाठवले.

त्यानंतर पुन्हा १० फेब्रुवारी रोजी चाळीसगावला घेऊन गेले आणि २३ फेब्रुवारीपर्यंत रोजी रात्री पुन्हा पाजून वेगवेगळ्या लोकांसोबत अनैतिक कृत्य करण्यास भाग पाडले. त्यानंतर तिला जळगावला पाठविले. तिने हा सगळा प्रकार आईला सांगितल आणि शनिवारी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

Web Title: Gang rape of minor girl by drinking soda

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here