Home अहमदनगर परिचारिकेशी तहसीलदारांची असभ्य वर्तणूक; तहसीलदारावर विनयभंगाचा गुन्हा

परिचारिकेशी तहसीलदारांची असभ्य वर्तणूक; तहसीलदारावर विनयभंगाचा गुन्हा

Ahmedngar Crime | अहमदनगर: परिचारिकेशी मद्यधुंद तहसीलदारांनी असभ्य वर्तणूक व शिवीगाळ केल्याची घटना, विनयभंगाचा (Molested)  गुन्हा दाखल.

Rude behavior of Tahsildars towards nurse Crime of molestation

कोपरगाव: कर्तव्यावर असणाऱ्या परिचारिकेशी मद्यधुंद तहसीलदारांनी असभ्य वर्तणूक व शिवीगाळ केल्याची घटना कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शनिवारी (दि. २५) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी परिचारिकेच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय बोरुडे असे गुन्हा दाखल झालेल्या तहसीलदारांचे नाव आहे.

कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात फिर्यादी परिचारिका शनिवारी रात्रपाळीला ड्युटीस होत्या. यावेळी तहसीलदार विजय बोरुडे हे अवेळी दारू पिऊन रुग्णालयात आले. त्यांनी परिचारिकेस. ‘तुमचे मेन अधिकारी कोण आहेत? अशी विचारणा केली. त्यानंतर परिचारिकेने दिलेला ड्युटी तक्ता बरुडे याने फेकून दिला. तसेच परिचारिकेच्या मोबाइलवरून वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही शिवीगाळ केली. याच रुग्णालयात कर्तव्यावर असलेले कक्षसेवक सचिन ठोंबरे यांना दवाखान्याच्या बाहेर काढून दिले. तसेच परिचारिकेच्या अंगावरून हात फिरवून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तिथे एका रुग्णाची नातेवाईक असलेल्या एका मुलीसोबतही असभ्य वर्तन करत शिवीगाळ केली. याप्रकरणी पुढील  तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Rude behavior of Tahsildars towards nurse Crime of molestation

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here