Nagpur Crime: अचानक ‘ब्रेकअप’ झाल्याने संतापलेला प्रियकर तरुणीच्या घरात घुसला. प्रेम संबंध न ठेवल्याने जीवे मारण्याची धमकी, मुलीचा पाठलाग करून विनयभंग (Molested).
नागपूर : अचानक ‘ब्रेकअप’ झाल्याने संतापलेला प्रियकर तरुणीच्या घरात घुसून प्रेम संबंध न ठेवल्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. तसेच तरुणीचा पाठलाग करीत छेड काढून विनयभंग करत असे. या प्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून त्याला अटक केली. संजू गिरिजाशंकर तिवारी (वय १८ वर्ष, रा. रामेश्वरी, शताब्दी चौक) असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे. १९ वर्षीय पीडित तरुणी महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला आरोपी संजू तिवारी हा मुलीच्या घराशेजारी भाड्याने राहत होता. शेजारी असल्याने ती संजूला ओळखत होती. दोघे आपापसात बोलत होते. दोघांची मैत्री झाली. दोघांचे धागेदोरे जुळले. त्यांचे नाते सुमारे एक वर्ष टिकले. मात्र, दरम्यानच्या काळात तरुणीची दुसऱ्या तरुणाशी मैत्री झाली. त्यामुळे संतापलेला संजू तिला समजावत होता. मात्र, मुलीने उलट संबंध सुरू ठेवण्यास नकार दिला.
दरम्यान तो इतरत्र राहायला गेला. तो तिच्याशी वेळोवेळी मोबाईलवर बोलत असे. मात्र, युवतीने त्याकडे दुर्लक्ष केलं . नुकतेच जेव्हा त्याने तिला कॉलेजला जाताना पाहिले तेव्हा तो पुन्हा प्रेमात पडला. तो तिच्या मागे लागला होता. आरोपी यानंतरही तरुणीचा पाठलाग करत होता. तो मुलीच्या कॉलेजसमोर उभा राहून तिला बोलण्यास भाग पाडत असे. व्यथित झालेल्या मुलीने याबाबत आईला माहिती दिली. यानंतर मुलीच्या आईने आरोपीच्या आईला याबाबत माहिती दिली.
मात्र, त्यानंतरही आरोपीने मुलीचा पाठलाग करून विनयभंग सुरूच ठेवला. १० एप्रिल रोजी आरोपीने मुलीच्या घरासमोर जाऊन मुलीची छेड काढण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने मुलीला जीवे मारण्याची धमकीही दिली. यानंतर मुलीच्या आईने तत्काळ प्रतापनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून आरोपीला अटक केली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Web Title: Death threat for not having love relationship, molested girl
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App