संगमनेर: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पिकअप ट्रॅक्टरचा भीषण अपघात, एक ठार
Sangamner News: पिकअपने ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना.
संगमनेर: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर संगमनेर तालुक्यातील डोळासणे येथे पिकअपने ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना गुरुवार ता.१३ एप्रिल रोजी सकाळी घडली. या अपघातात ट्रॅक्टर चालक हा जागीच ठार झाला असून त्याठिकाणाहून पायी जाणारे तीन मुलेही जखमी झाले.
अनुराग बाबाजी गोडे, अपेक्षा दत्तात्रय गोडे, राणी लहु लोहकरे हे तिघेही जखमी झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गुरूवारी सकाळी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील डोळासणे शिवारात संतोष नारायण शिंदे हे (रा. उंब्रज एक ता.जुन्नर जि.पुणे) हे ट्रॅक्टर घेऊन आळेफाटा मार्गे संगमनेरच्या दिशेने जात होते. त्याच दरम्यान पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या पिकअपने ट्रॅक्टरला जोराची धडक दिली.
गुरूवारी सकाळी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील डोळासणे शिवारात आले असता त्यामुळे झालेल्या भीषण अपघातात ट्रॅक्टरचालक संतोष नारायण शिंदे हे जागीच ठार झाले.तर त्याच दरम्यान त्या ठिकाणाहून जाणार्या तीन मुलांनाही धडक बसली. त्यामुळे ट्रॅक्टर चालक हा जागीच ठार झाला असून त्याठिकाणाहून पायी जाणारे तीन मुलेही जखमी झाले आहेत.
Web Title: One killed in tractor-truck accident on Pune-Nashik National Highway
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App