Home महाराष्ट्र लसींचे दोन डोस घेतलेल्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय  

लसींचे दोन डोस घेतलेल्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय  

decision of the state government for those who have taken two doses of vaccination

Vaccination News: कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींसाठी राज्यसरकारने मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत आदेश काढण्यात आला आहे. लसींची दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींना महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी करण्याची सक्ती न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र दुसरा डोस घेतल्यानंतर १५ दिवसांच्या मुदतीनंतरच त्या व्यक्तींना महाराष्ट्रात सुट मिळणार आहे.

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी हा आदेश गुरुवारी रात्री जारी केला आहे. संबंधित व्यक्तीकडे लसीकरण पूर्ण झाल्याचे कोविन पोर्टलचे सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. ही सवलत देशांतर्गत व देशाबाहेरून महाराष्ट्रात येणाऱ्या सर्वासाठी लागू आहे.

दरम्यान अन्य प्रवाशांसाठी आरटपीसीआर चाचणी वैधता ४८ तासांऐवजी ७२ तास इतकी करण्यात आली आहे.

Web Title: decision of the state government for those who have taken two doses of vaccination

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here