Home क्राईम संगमनेर: विवाहित महिला शेतात काम करीत असताना विनयभंग

संगमनेर: विवाहित महिला शेतात काम करीत असताना विनयभंग

Sangamner Crime Married women molested while working in the fields

संगमनेर | Crime: संगमनेर तालुक्यातील पठार भागातील वनकुटे विवाहित महिला शेतात काम करीत असतांना विनयभंग केल्याची घटना घडली आहे. बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात एका जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वनकुटे येथील विवाहित महिला शेतात काम काम करीत असताना येथील सोमनाथ संता कडाळे हा शेजारील शेतात काम करत होता. त्यावेळी पिडीत महिलेस खडा मारून शिट्टी मारू लागला त्यानंतर वाईट गाणे गावून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. याप्रकरणी पिडीत महिलेने सोमनाथ कडाळे याच्याविरोधात फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल राजू खेडकर हे करीत आहे.

Web Title: Sangamner Crime Married women molested while working in the fields

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here