Home Accident News विजेच्या तारेवर तरुणाचा पाय पडल्याने तरुणाचा मृत्यू, वडील आणि भाऊ जखमी

विजेच्या तारेवर तरुणाचा पाय पडल्याने तरुणाचा मृत्यू, वडील आणि भाऊ जखमी

Accident young man dies after falling on a power line

जामखेड | Accident: जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथे पहाटेच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली आहे. पहाटे शौचासाठी घराबाहेर जात असताना घराबाहेर पडलेल्या विजेच्या तारेवर तरुणाचा पाय पडल्याने वडील व भाऊ त्यास ओढण्याचा प्रयत्न करीत असताना दोघांना जबर धक्का बसून जखमी झाले तर एकाचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.

योगेश बळीराम जायभाय असे या मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, योगेश जायभाय हा पहाटे सहा वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे उठून शौचालायास जात असताना घराजवळील विद्युत खांबावरील तार तुटून खाली पडलेली होती. ती त्याने पहिली नाही. या तेरवर त्याचा पाय पडल्याने शॉक बसला त्यामुळे तो मोठ्याने ओरडला. त्यावेळी त्याचे वडील बळीराम व भाऊ गोकुळ यांनी त्यास ओढण्याचा प्रयत्न केला असता त्या दोघांना विजेचा शॉक बसला व ते खाली पडले. यावेळी वडील बेशुद्ध पडले तर गोकुळ याचा हात भाजला. यावेळी शेजारील नातेवाईक यांनी दोरीच्या सहायाने तार बाजूला करून योगेश यास जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.

Web Title:  Accident young man dies after falling on a power line

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here