Home संगमनेर संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर दरडी कोसळत असल्याने प्रवाशांचा जीव मुठीत

संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर दरडी कोसळत असल्याने प्रवाशांचा जीव मुठीत

Sangamner stake as a patient is collapsing on Nashik-Pune highway

संगमनेर | Sangamner: नाशिक पुणे महामार्गावरील संगमनेर तालूक्यातील चंदनापुरी घाटात नुकतीच शुक्रवारी सकाळी दरड कोसळली. यामध्ये छोटे छोटे दगड डोंगर माथ्यावरून नाशिक पुणे महामार्गावर पडले होते. एकेरी वाहतूक सुरु केली होती.

लाखो रुपये खर्च करून सुरक्षा जाळ्या बसविण्यात आलेल्या आहे. पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाला सुरुवात होतेच ते दरडी कोसळत असल्याने घाट परिसरातून वाहन चालकांना आपला जीव मुठीत ठेवून प्रवास करावा लागत आहे.

सिन्नर ते खेड असे चौपदरीकरण झालेले आहे. डोंगर फोडून बाह्य वळणे काढण्यात आली आहे. सुरुंगाचा वापर करण्यात आल्याने डोंगरांना तडे गेले आहे. पावसाळ्यात पावसाचे पाणी झिरपते त्यामुळे दगड सुट्टे होऊन महामार्गावर कोसळले. याबाबत माहिती समजताच डोळसणे पोलीस कर्मचारी दाखल होत दगड बाजूला घेत वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान दोन वर्षापूर्वी असे सुरक्षा जाळ्या तोडून दरडी कोसळल्याच्या घटना या घाटात घडल्या आहेत.  

Web Title: Sangamner stake as a patient is collapsing on Nashik-Pune highway

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here