राज्यघटना बदलणं चिक्की खाण्याइतक सोपं नाही: धनंजय मुंडे बरसले
राज्यघटना बदलणं चिक्की खाण्याइतक सोपं नाही: धनंजय मुंडे बरसले
बीड: सत्ताधार्यांकडून सातत्याने राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न होत आहे. बीडच्या पालकमंत्री भर प्रचार सभेत राज्यघटना बदलण्याची भाषा बोलत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली घटना बदलणं चिक्की खाण्याइतक सोपं नाही असे म्हणत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना लक्ष्य केलं.
पंकजा मुंडे यांच्याकडून निवडणूक प्रचारासाठी घेण्यात आलेल्या भाषणावेळी अनावधानाने राज्यघटना बदलू असा शब्द गेला होता. मात्र त्यांनी आपली चूक लगेच सुधारत पंकजा मुंडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी आपल्याला राज्यघटना दिली संविधान दिले त्यामुळे आपण इथे पोहोचलो आहोत असे म्हंटले. तसेच पंकजा मुंडे यांनी बाबासाहेब आंबेडकरांची महत्ती थोडक्यात विषद केली.
दरम्यान धनंजय मुंडेनी पंकजा यांच्या त्या विधानाचा धागा पकडत त्यांच्यावर सडकून टीका केली. राज्यघटना बदलन चिक्की खाण्याइतक सोपं नाही अशी त्यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली.
Website Title: Dhananjay Mundhe Changing Constitution is not as easy to eat as chikki