Home अहमदनगर साईबाबांवर वक्तव्य प्रसिद्धीसाठी धीरेंद्र शास्त्रींच थोतांड; विखे पाटलांनी खडेबोल सुनावले

साईबाबांवर वक्तव्य प्रसिद्धीसाठी धीरेंद्र शास्त्रींच थोतांड; विखे पाटलांनी खडेबोल सुनावले

Shirdi News | Dhirendra Shastri’s statement on Saibaba : बागेश्वर धाम सरकार म्हणून प्रसिद्ध असलेले धीरेंद्र शास्त्री  यांनी पुन्हा एकदा एक धक्कादायक वक्तव्य, वक्‍तव्‍याचा मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी तीव्र शब्‍दात निषेध.

Dhirendra Shastri's statement on Saibaba was criticized Vikhe Patal uttered harsh words

शिर्डी:  आपल्या वक्तव्यांनी सातत्याने चर्चेत असणाऱ्या बागेश्वर धाम सरकार म्हणून प्रसिद्ध असलेले धीरेंद्र शास्त्री  यांनी पुन्हा एकदा एक धक्कादायक वक्तव्य केले आहे. साईबाबांवर विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना धीरेंद्र शास्त्री यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. जबलपूरच्या पनगर येथे श्रीमद भागवत कथेच्या शेवटच्या दिवशी लोकांशी संवाद साधताना पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना साईबाबांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले.

धीरेंद्र शास्‍त्रींनी साईबाबांच्‍या संदर्भात केलेल्‍या वक्‍तव्‍याचा मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी तीव्र शब्‍दात निषेध केला आहे. धर्माचा काय प्रचार करायचा तो जरुर करा परंतू दुसऱ्याचा अवमान करण्‍याचा आधिकार तुम्‍हाला नाही अशा शब्‍दात त्‍यांनी माध्‍यमांशी बोलताना धिरेंद्र कृष्‍ण शास्‍त्रींना खडेबोल सुनावले.

विखे पाटील म्‍हणाले की, धीरेंद्र कृष्‍ण शास्‍त्रींकडून यापुर्वी अशी वादग्रस्‍त विधानं झाली आहेत. अंधश्रध्‍दा निर्मुलन समितीचे आव्‍हान स्विकारायला ते तयार नाहीत याकडे लक्ष वेधून श्री.साईबाबांबद्दल अशा पध्‍दतीची नेहमीच वादग्रस्‍त विधानं करुन, बुध्‍दीभेद निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न केला जातो. यामुळे धार्मिक आणि सामाजिक तेढही निर्माण होते. अशा बाबा लोकांची वक्‍तव्‍य ही केवळ सवंग लोकप्रियतेचे एक थोतांड असल्‍याची संतप्‍त प्रतिक्रीया त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

श्री.साईबाबांनी आपल्‍या संपुर्ण वाटचालीत माणसांमध्‍ये देव पाहिला. म्‍हणूनच श्री.साईबाबांचा सबका मालिक एक असे आपण म्‍हणतो. श्रध्‍दा आणि सबुरीचा महामंत्र त्‍यांनी विश्‍वाला दिला. त्‍या आधारेच आज संपूर्ण विश्‍वाची वाटचाल सुरु आहे, लाखो भक्‍तांचे ते श्रध्‍दास्‍थान आहे. कुणाच्‍या श्रध्‍देवर चिखलफेक करण्‍याचा कोणालाही आधिकार नाही अशा शब्‍दात धिरेंद्र कृष्‍ण शास्‍त्रींच्‍या वक्‍तव्‍याचा त्‍यांनी समाचार घेतला.

महाराष्‍ट्र संताची भूमी आहे, संतानीच हा समाज उभा करण्‍याचे मोठे काम केले. त्‍यांच्‍यामध्‍येच आम्‍ही देव बघतो. परंतू या संताप्रतीच असणा-या श्रध्‍देला कोणी अवमानीत करीत असेल तर ते कदापीही आम्‍ही सहन करणार नाही. धर्माचा काय प्रचार करायचा तो करा परंतू दुस-याचा अवमान करण्‍याचा आधिकार तुम्‍हाला नाही अशा परखड शब्‍दात धिरेंद्र शास्‍त्रींच्‍या वक्‍तव्‍यावर मंत्री विखे पाटील यांनी टिका केली.

बागेश्वर बाबा यांनी शिर्डीच्या साईबाबांच्या देवत्ताविषयी शंका उपस्थित केली. यावेळी बागेश्वर बाबा यांनी साईबाबांची अक्षरश: खिल्ली उडविली. साईबाबा हे देव असू शकत नाहीत. हिंदू धर्माचे प्रमुख शंकराचार्य साईबाबांना देव मानत नाहीत. त्यामुळे सनातन हिंदू म्हणून मीदेखील साईबाबांना मानत नाही. गिधड की खाल पहनकर कोई शेर नही हो सकता, असे बागेश्वर बाबा यांनी म्हटले होते. मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत, पण साईबाबा हे संत असू शकतात, फकीर असू शकतात पण देव नाही, असे उद्गार धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी काढले होते.

Web Title: Dhirendra Shastri’s statement on Saibaba was criticized Vikhe Patal uttered harsh words

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here