Home क्राईम Rape Case: गतीमंद मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक

Rape Case: गतीमंद मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक

Mumbai Crime: १२ वर्षांच्या गतीमंद मुलीवर ३८ वर्षीय व्यक्तीने बलात्कार (Rape),  तसेच अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना.

Impaired girl rape, accused arrested

मुंबई: मानखुर्द येथे १२ वर्षांच्या गतीमंद मुलीवर ३८ वर्षीय व्यक्तीने बलात्कार, तसेच अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून मानखुर्द पोलिसांनी बलात्कार, अनैसर्गिक अत्याचार व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला रविवारी पहाटे अटक केली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पीडित मुलगी गतीमंद आहे, त्याचा फायदा उचलून आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. आरोपीने पीडित मुलीला द्राक्ष व खाऊ देण्याचे आमीष दाखवून आपल्या राहत्या घरी नेले व तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार पीडित मुलीच्या आईला समजल्यानंतर त्यांनी याप्रकरणी मानखुर्द पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी भादंवि कलमांतर्गत बलात्कार, अनैसर्गिक अत्याचार व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल होताच पोलिसांचे पथक आरोपी राहत असलेल्या परिसरात रवाना झाले. त्यांनी आरोपीला शोधून रविवारी पहाटे अटक केली. आरोपी व्यापारी असून त्याचे दुकान आहे. पीडित मुलीची रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Impaired girl rape, accused arrested

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here