Home संगमनेर संगमनेर: धूमस्टाईलने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविले

संगमनेर: धूमस्टाईलने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबविले

Breaking News | Sangamner Crime: धूमस्टाईलने आलेल्या दोघा चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे मंगळसूत्र ओरबाडून धूम ठोकल्याची घटना.

Dhoomstyle lengthened the mangalsutra around the woman's neck

संगमनेर: अवघ्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा संगमनेरात सोनसाखळी चोरटे सक्रीय झाल्याचे अधोरेखीत झाले आहे. शहरातील सुयोग कॉलनी ते आझाद चौक दरम्यान धूमस्टाईलने आलेल्या दोघा चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे मंगळसूत्र ओरबाडून धूम ठोकल्याची घटना बुधवार दि. १७ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा ते सात वाजेच्या सुमारास घडली आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की संगमनेर शहरातील सुयोग कॉलनी येथील सुयोग कांतीलाल गांधी यांची आई सायंकाळच्या वेळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. त्यावेळी सुयोग कॉलनी ते आझाद चौक दरम्यान अज्ञात दोघा भामट्यांनी विना क्रमांकाच्या मोटारसायकलवरुन येऊन त्यांच्या गळ्यातील ५५ हजार रुपये किंमतीचे साडेतीन तोळे वजनाचे मंगळसूत्र ओरबाडून पोबारा केला.

याप्रकरणी सुयोग गांधी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात दोघा चोरट्यांवर शहर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भान्सी हे करत आहे. शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Web Title: Dhoomstyle lengthened the mangalsutra around the woman’s neck crime filed

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here