Home संगमनेर संगमनेरातील अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीची छापेमारी

संगमनेरातील अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीची छापेमारी

Breaking News | Sangamner Raids: २० लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त

LCB raids on illegal slaughterhouses in Sangamner

संगमनेर: पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने कडक कारवाईचे आदेश दिलेले आहे. त्यानुसार पथकाने शुक्रवार दि. १९ एप्रिल रोजी पहाटे २.१५ वाजता संगमनेर शहरातील अवैध कत्तलखान्यांवर छापेमारी करुन तीन आरोपींसह २० लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडक कारवाईने अवैध धंदेचालकांचे धाबे दणाणले आहेत.

पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार सचिन अडबल, बापूसाहेब फोलाणे, गणेश भिंगारदे, संतोष लोंढे, अतुल लोटके, संतोष खैरे, रणजीत जाधव, रवींद्र घुंगासे, सागर ससाणे, बाळासाहेब गुंजाळ, आकाश काळे, विशाल तनपुरे, उमाकांत गावडे यांच्या पथकाला संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अवैध धंद्यांची माहिती काढत असताना पथकाला गुप्त बातमीदारामार्फत जमजम कॉलनी येथे गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याची माहिती मिळाली होती.

त्यावरून पहाटे २.१५ वाजता पथकाला रैय्यान शेरखान पठाण (वय २१, रा. रहेमतनगर, जोर्वे रोड, संगमनेर), सलमान हारुन मणियार (वय ३४, रा. मोमीनपुरा, छोटी मस्जिदजवळ, संगमनेर) व राझिक अब्दुल रज्जाक शेख (वय ३८, रा. अंलकानगर, दिल्ली नाका, संगमनेर) हे तिघे दोन पिकअपमध्ये गोमांस भरताना दिसले. पथकाने त्यांना ताब्यात घेऊन ६ लाख रुपये किमतीची पिकअप (क्रमांक एमएच.१७, बीडी. ४१८२) व त्यात भरलेले ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे १५०० किलो गोमांस तसेच ६ लाख रुपये किमतीची पिकअप (क्रमांक एमएच.११ एजी. ३२४६) व त्यात भरलेल १४०० किलो गोमांस, दोन हजार रुपये किमतीचा एक सत्तूर, दोन सुरे व एक कुऱ्हाड असा एकूण २० लाख ७२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी पोहेकॉ. सचिन अडबल यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संगमनेर शहर पोलिसांत विविध कलमांसह महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम सन १९९५ चे सुधारित २०१५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: LCB raids on illegal slaughterhouses in Sangamner

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here